Home Breaking News ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसतर्फे महामानवास अभिवादन

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसतर्फे महामानवास अभिवादन

0
60

रेखा कैथल

जिल्हा ब्युरो चीफ

रंजल्या गांजल्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य घालवले – किरण बोढे

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे बुधवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या वर्ण व्यवस्थेत हजारो वर्ष रंजल्या गांजल्यानी जिवन घालविलेल्या जीवांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचले. ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाच्या महतीवर आज देश वाटचाल करतो व प्रगल्भ लोकशाही मिरवत आहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते.

यावेळी वैशाली आत्राम, वनिता नन्नावरे, कल्पना पाठक, अल्का सोनटक्के, मंगला कांबळे, सुकला गद्दलवार, आबाजी मत्ते, कैलास ठाकरे, गोरेलाल वर्मा, सुनंदा लिहीतकर, निशा उरकुडे, वैशाली भालशंकर, शारदा झाडे, शारदा फुलझले, प्रीती भगत, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार, कुमुदिनी हनुमंते, पायल वाडगुरे, वैष्णवी मडावी व नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here