Home Breaking News दी.27 नोव्हेंबर 2023 बेलोरा तहसील भद्रावती येथे गौ तस्करी वाहन पकडण्यात आले

दी.27 नोव्हेंबर 2023 बेलोरा तहसील भद्रावती येथे गौ तस्करी वाहन पकडण्यात आले

0
65

 

चंद्रपूर:- मध्य प्रदेश सागर गाव येथुन बादशाह नामक व्यक्ती कडुन वसीम व्यक्ती जो गडचांदुर ला राहतो याच्या कडे गाडी क्रमांक CG 08 A T8086 (आयशर) द्वारे 40-50 गौ तस्करी सुरू होती.

ही गाडी मेन हाईव्हे मार्ग सोडुन आतल्या टाकळी बेलोरो मार्गे भद्रावती कडे जात असतांना बेलोरा गावकरी द्वारे संशयास्पद विचारपूस केल्या असता गाडी ने पळ काढला आणि गाडी बेलोरा गावात रस्त्याच्या बाजुला असलेल्या गड्यात फसली.. प्रसंगी ड्रायव्हर ने घटना स्थळावरून पळ काढला परंतु सहचालक नदीम नामक व्यक्ती ला पकडन्यात आले तो पळ काढण्याची कोशीश करत असल्याने गावातील लोकांना सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ता श्री.मनोज वसंत ठेंगणे (मा सैनिक) यांना बोलावले.

 

श्री.मनोज ठेंगणे आणि श्री प्रमोद नागोसे (वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख कांग्रेस) यांनी घटनास्थळी येऊन गौ यांना रेस्क्यु केले… घटनास्थळी प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज वसंत ठेंगणे,श्री. प्रमोद नागोसे (भद्रावती वरोरा विधानसभा प्रमुख कांग्रेस), श्री.दिपक तुरारे (राष्ट्रीय बजरंग दल),श्री.सुरज साहा(राष्ट्रीय बजरंग दल),तसेच बलोरा गावकरी उपस्थित होते.आता पुढील कार्यवाही भद्रावती पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here