माननीय एकनाथ जी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने तथा माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे सूचनेनुसार मा . श्री गंगाधरजी बडूरे साहेब यांचे मार्गदर्शनात माननीय श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे पोंभूर्णा नगरीत प्रथम आगमन झाले . पोंभूर्णा नगरित बाईक रॅली काढून नितीन मत्ते यांचे जंगी स्वागत करण्यात आले . डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना हार टाकून वंदन करून बाईक रॅलीने शासकीय रेस्ट हाऊस येते आणण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला बल्लारपूर विधानसभा क्षेत्र, विधानसभा प्रमुख विनोदभाऊ चांदेकर,चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,शहर प्रमुख संतोष पार्लेवार,उपतालुकाप्रमुख नंदुभाऊ पोतराजे,तालुका समन्वयक व्यंकटेश चिप्पावार,यांच्या उपस्थितत आज श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेने मध्ये पोंभूर्णा येथील रेस्ट हाऊस मध्ये असंख्य ग्रामीण व पोंभूर्णा शहरातील स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला . यावेळी तालुका संघटक म्हणून सचिन मडावी रा.भटारी यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच पोंभुर्णा येथील कार्यकर्ते, चेक आष्टा येथील कार्यकर्ते, जामतुकुम येथील कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला.यावेळी तालुका प्रमुख आकाश कावडे मूल,मूल शहर प्रमुख विशाल नागुलवार, युवासेना तालुका प्रमुख रजत ढोंगे,अविनाश सातपुते,वेदप्रकाश आगरकर,अमोल मोगरकर,जयदेव मडावी,प्रफुल गव्हारे,राकेश लिंगलवार, लीलाराम कष्टी,असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर जिल्हा प्रमुख यांनी तालुक्यात पक्षसंघटना मजबुती करण्यासाठी मार्गदर्शन केले . यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*


