Home Breaking News जनतेच्या बचतीवर डल्ला मारणाऱ्या आधारस्तंभ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेवर कारवाई करा  ...

जनतेच्या बचतीवर डल्ला मारणाऱ्या आधारस्तंभ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेवर कारवाई करा  काँग्रेसची सहाय्यक निबंधकाला निवेदनातून मागणी

0
61

घुग्घूस : येथील आधारस्तंभ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.घुग्घुसने मुदतठेव व दैनिक ठेविधारकांचे रक्कम परत देत नसल्याने पतसंस्थेच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकांनी काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात धाव घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

सदर पतसंस्थेच्या संचालकांनी पतसंस्थे तर्फे देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुली करिता बळजबरी शुरु केलेली आहे.

मात्र ज्या खातेधारकांची मुदतठेव,व दैनिक ठेवीची मुदत पूर्ण झालेली आहे त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदर संचालकांनी पतसंस्थेच्या रकमेचा गैरवापर करीत अनेक ठिकाणी जमिनी विकत घेतल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे.

यागंभीर प्रकरणाची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी तालुकास्तरीय साहाय्यक निबंधक (AR) यांना सदर पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाई करून नागरिकांची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

तसेच या पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक न करता संचालकांनी गैरमार्गाने खरेदी केलेली जमीन व अन्य मालमत्ता जप्ती करून नागरिकांचे पैसे परत करावे अशी मागणी केली असून या पतसंस्थे विरोधात लवकरच आंदोलन ही छेळण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here