Home Breaking News अमराई भुस्खलन नागरिकांना घर मिळावे ही स्व.खासदार बाळू धानोरकरांचीच मागणी

अमराई भुस्खलन नागरिकांना घर मिळावे ही स्व.खासदार बाळू धानोरकरांचीच मागणी

0
60

घुग्घूस : अमराई येथील गजानन मडावी यांचे घर जवळपास सत्तर फूट जमिनीखाली गाडले गेले

या भयंकर अश्या घटने नंतर येथील नागरिकांचे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने तात्पुरते स्थलांतर करण्यात आले

या घटनेची भीषणता व नागरिकांची परिस्थिती लक्षात घेता लोकनेते स्व.बाळू धानोरकर यांनी नागरिकांना हक्काची घरे मिळायलाच हवी अशी ठाम भूमिका घेत वेकोली व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे घेण्यात आले त्याप्रसंगी तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वेकोली महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, तहसीलदार, काँग्रेस नेते राजुरेड्डी,रोशन पचारे,पवन आगदारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 160 कुटुंबियांना सात महिन्याचे घरभाडे व जमिनीचे पट्टे देण्यासंदर्भात निर्णय झाला
आणि अत्यंत वेगाने अंमलबजावणी ही सुरू झाली खासदारांनी नागरिका करिता एक – एक महिन्याचे अनाज ही उपलब्ध करून दिले.
नियतीने घात केला व खासदारांना हिरावून नेल्याने सदर पुनर्वसनाच्या कामाला विलंब झाला मात्र उशिरा का होईना आता नागरिकांना घरपट्टे मिळणार आहे.

अमराई येथील एकशे साठ कुटुंबियांच्या पुनर्वसन प्रक्रियेत स्व. खासदार बाळू धानोरकरांचा सिंहाचा वाटा आहे
बाळू भाऊंनी बघितलेल्या स्वप्नांची लवकरच पूर्तता होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here