![]()
चंद्रपूर – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानोदया अकॅडेमी तुकूम चंद्रपूरद्वारा स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात वार्षीक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा उद्दात्त वारसा बालगोपालांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
![]()
या कार्यक्रमास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, नायब तहसीलदार सौ. ज्योती कुचनकर, सौ. प्रज्ञा वाढेकर सहा. पोलीस निरीक्षक (भरोसा सेल), समुद्रपूरचे गट शिक्षणाधिकारी अशोक गिदेवार, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. मासिरकर, डॉ. कासटवार, डॉ. निकिता गिदेवार हिंगणघाट, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका पुष्पाताई उराडे, सौ. निताताई बोरगमवार, सौ. मंजुश्री कासनगोट्टूवार, सौ. वर्षा सुरंगळीकर, सचिन सुरंगळीकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर म्हणाले की ज्ञानोदया अकॅडेमीच्या वतीने स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून बालकांवर केलेले संस्कार हे त्यांच्या सादरीकरणातून झळकत असून बालवयापासूनच देशाची संस्कृती, इतिहास व परंपरा मनामध्ये बिंबविल्यानेच या बालकांमधून भावी नेतृत्व घडून तेच देशाचे भाग्यविधाता ठरतील.
मान्यवर अतिथींनी बालकलाकारांनी सादर केलेले सांस्कृतिक व ऐतिहासिक दृश्य बघून त्यांच्या कलेची प्रशंसा केली, सुरुवातीला भारती मॅडम, प्रियंका मॅडम, मुक्कावार मॅडम, लोहम्बरे मॅडम यांनी स्वागतगीताद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले, जाणता राजा या नाटिकेच्या यशाकरिता शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. आपल्या प्रास्तविकपर भाषणात मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा गंधेवार (बोरगमवार) यांनी ज्ञानोदया अकॅडेमी केवळ ज्ञानदानाचेच कार्य करीत नसून बालकांच्या बौद्धिक, शारीरिक व त्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्याऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांची योग्य प्रकारे जडणघडण करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शितल खांडेकर, कांचन अलोणे, लिना इंगुलवार, राजश्री कुळमेथे, सिद्धी पराये, चिडे, आरती खोब्रागडे या शिक्षकवृंदानी तसेच मालाताई, संगीताताई आत्राम, ज्योतीताई तांगडे, गौरव राठोड यांनी परिश्रम घेतले. बालगोपाल अभ्यंग, आराध्य, किंजल, हिमांशी यांनी पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमास बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते.


