Home Breaking News चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना आदरांजली

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना आदरांजली

0
35


चंद्रपूर ३० जानेवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार ३० जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त आयुक्त अकुनुरी नरेश,भा.प्र.से. यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून व मौन पाळून अभिवादन करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणुन देशभर साजरा करण्यात येतो.मनपाच्या वतीने सर्वप्रथम जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले, नंतर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र व माल्यार्पण, हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र व माल्यार्पण व गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले तसेच काही क्षण मौन पाळुन करून आदरांजली वाहण्यात आली,
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, नगर सचिव नरेंद्र बोबाटे,डॉ.अमोल शेळके,मनोज सोनकुसरे, आशीष जीवतोडे,विकास दानव, गुरुदास नवले तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here