![]()
मुंबई : महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फार मोठे संकट कोसळले आहे. दरवर्षी विदर्भ व मराठवाड्यातील पदाधिकारी शिवसैनिक फार मोठ्या संख्येने मोठया उत्साहात सहभागी होत असतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांना मदत करण्यात व्यस्त आहेत.तसेच या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मुंबई येथे येण्यास गैरसोयीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेता संवेदनशील मनाचे आमचे नेते ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी विदर्भ व मराठवाडा येथील पदाधिकारी व शिवसैनिकांना मुंबई येथील दसरा मेळाव्याला न येण्याचे आवाहन केले आहे..!
तरी मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्याला विदर्भातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहू नये ही नम्र विनंती..
युवराज धानोरकर
जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर शिवसेना


