Home Breaking News जनसुरक्षा विधेयक विरोधी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने भव्य धारणा – निदर्शने...

जनसुरक्षा विधेयक विरोधी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने भव्य धारणा – निदर्शने आंदोलन कार्यक्रम संपन्न

0
45

 

चंद्रपूर :- येथील नुकताच जनसुरक्षा विधेयक विरोधी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने धरणा – निदर्शने आंदोलन कार्यक्रम जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात चंद्रपूर येथे ऐक दिवसीय पर पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश वाघमारे हे होते.

तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड कॉम्रेड प्रा नामदेव कन्नाके माजी सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष – कॉम्रेड प्रा रमेशचंद्र दहिवडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – कॉम्रेड रवींद्र उमाटे जिल्हा भारतीय कम्यु निस्ट पक्ष – कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष – कॉम्रेड प्रकाश रेड्डी माजी सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष – कॉम्रेड रामदास डाहुले जेष्ठ कम्युनिस्ट नेते – हरीश भाई दुर्योधन जिल्हा अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( कवाडे गट ) – किशोर जामदार – अशोक तुमराम – किशोर पोतनवार – अनिरुद्ध वनकर महारष्ट्राचे गायक इत्यादी अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

यात मार्गदर्शनपर वक्त्यांचे भाषण झाले 

या आंदोलनात कामगार – साहित्यिक – कलाकार – सामाजिक संघटना व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.  जोरदार घोषणाबाजीने हा परिसर अक्षरशःदानानून गेला होता व लाल झेंडे व निळे झेंडे लहरत होते. आंदोलनाची सुरवात गोपाल अमृतकर यांच्या क्रांतिगीताने केली.

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 अखेर विधानसभा व विधानपरिषदेत पारित झाले त्याची उर्वरित पक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे राज्यपालांच्या सही नंतर नियम करून हा कायदा लागू होईल हे विधेयक प्रथमता विधिमंडळाच्या पाटलावर ठेवण्यात आल्यापासून अनेक विचारवंत स्वतंत्र पत्रकार आणि संघटना याचा विरोध करत आहे त्याला कारणही तसेच आहे हे विधेयक संविधान विरोधी – लोकशाही विरोधी तर आहेच शिवाय यातून न्यायालयाला वगळून सरकारला हुकूमशाही पद्धतीने वागण्याची मुभा देण्यात आली आहे परंतु चिंतेची बाब अशी कि सामान्य लोकांना तर सोडाच अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना देखील या कायद्याच्या भीषणे बाबत अजिबात कल्पना नाही हा कायदा रद्द केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र जणआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात समर्थन व पाठिंबा देण्या करिता मुसळे – मयूर  राईकवार आम आदमी पार्टी – राजेंद्र वैद्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ( शरद पवार गट ) व अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. या कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड रवींद्र उमाटे यांनी केले व प्रास्ताविक कॉम्रेड अरुण भेलके यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड राजू गैनवार यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here