गिरड विशेष प्रतिनिधि
प्रमोद झिबड
समुद्रपुर
तालुका अध्यक्ष पदाच्या माध्यमातून राज्यातील लोक प्रतिनिधिंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. असे सम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांनी सांगितले.
मुंबईतील २०२५ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिंगणघाट – समुद्रपूर – सिंधी (रेल्वे) मतदार संघाचे आमदार समीर भाऊ कुणावार यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका
अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.
पूर्वी नागपूर अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी नियुक्ती होत त्यांनी सलग सात तास सभागृह चालवण्याचा विक्रम केला होता. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक विधानसभेचे मा.अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी सभागृहात विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली .
उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कारही मिळाला आहे .
या निवडीनंतर आमदार समीर भाऊ कुणावर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांच्यासह सहकारी आमदारांचे आभार मानले.


