![]()
![]()
विभागीय वन अधिकारी चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर व जिल्हा खनिज प्रतिष्ठान प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत सन 2025 2026 या आर्थिक वर्षात आयोजित सात दिवसीय बांबू कारागीर यांचे कौशल्य बुद्धीसाठी प्रशिक्षण अंतर्गत बांबू हस्तकला या विषयात दिनांक 8/5/2025 ते 14/5/2025 पर्यंत ७ दिवसीय यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या २५ महिलांसाठी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आणि गावातील लोकांना वन विभागाचे कार्य व महत्त्व समजण्यासाठी आयोजन हे आम्रपाली बुद्ध विहार गुगुस येथे करण्यात आलं. या समारोपीय कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय श्री नायगावकर सर RFO हे होते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री राखुंडे सर व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भारत साळवे उपाध्यक्ष आम्रपाली बुद्ध विहार, व सुरेखा टिपले महिला अध्यक्ष आम्रपाली बुद्ध विहार, व आदरणीय किशोर गायकवाड सर बी आर टी सी चे समन्वयक व आदरणीय वैशाली ढवस वार्ड मेंबर वशील प्रोडक्शन चे प्रोप्रायटर श्री सुशील सहारे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला मल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून राज्य गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत शिबिरार्थी महिलांनी तयार केलेल्या पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला. सपना कागदेलवार व अर्चना पोईनकर. यांनी झालेल्या शिबिरा बाबतीत मनोगत व्यक्त केल. पाहुण्यांनी महिलांना शुभेच्छा व त्यांनी तयार केलेल्या वस्तूचं मार्केट प्राप्त व्हाव यासाठी प्रयत्न करू अशी आश्वासन देण्यात आले. परत असे विविध शिबिर घेण्यात येईल अशी ग्वाही दिली तर आणि अशा प्रशिक्षणाने व आयोजनाने वन विभाग आणि सामान्य माणसाचं नातं आणखी घट्ट होईल असेही फॉरेस्ट ऑफिसर नायगावकर सर म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन संगीता बुरडकर व आभार प्रदर्शन श्री. सुशील सहारे यांनी केले.


