Home Breaking News वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११६ वा जयंती महोत्सव अर्थात ग्राम जयंती.!

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११६ वा जयंती महोत्सव अर्थात ग्राम जयंती.!

0
45

गिरड विशेष प्रतिनिधी

प्रमोद झिबड

समुद्रपुर

 

दिनांक २७ एप्रिल २०२५. वर्धा जिल्हा समुद्रपुर तालुक्यातील वायगाव (हळद्या) माऊली सभागृह येथे उपस्थित.!

इंजि. सप्त खंजिरी वादक श्री.भाऊसाहेब थुटे यांनी दीप्रज्वलन करून श्री.गोपाळकृष्ण राऊतजी तसेच श्री.दामोदर जी राऊत यांचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगितेला मालाअर्पण करण्यात आले.आणि

७ वाजता सामुदायिक प्रार्थनेने सुरुवात झाली. प्रार्थनेवर सप्त खंजिरी वादक प्रबोधनकार इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांचे चिंतन झाले. त्यानंतर गावातील निराधार वयवृद्ध सखुबाई ग्या. शेंडे यांना सुमनबाई ना.भोले व मान्यवर मंडळीच्या हस्ते पातळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर लगेच अभिनव धुलिवंदन चे प्रणेते सप्त खंजिरी वादक ग्रामगीता प्रबोधनकार श्री. प्रवीण भाऊ देशमुख यांचे कीर्तन झाले. सदर कार्यक्रमाला गुरुकृपा बचत गटाचे अध्यक्ष श्री गोपाळ कृष्ण राऊत दादा पतंजली योग समितीचे अध्यक्ष श्री. दामोदर जी राऊत अखिल भारतीय गुरुदेव मंडळाचे आजीवन प्रचारक दलित मित्र पुरस्कार प्राप्त बाळकृष्ण देवाजी हांडे वर्धा,

श्री.वसंतराव जी कुचेवार वर्धा, श्री. प्रमोद दाजी वाघ वर्धा,

उमेश जी कापकर वर्धा, श्री.

कदम तसेच पंचक्रोशीतून आलेली मंडळी तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने ग्राम जयंती कार्यक्रमाला उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचा आयोजन श्री.रमेशजी भोले साहेब,वायगाव हळद्या व मित्रपरिवार तसेच हनुमान देवस्थान पंचकमिटी, शिवशक्ती भजन मंडळ,सर्व धर्म समभाव मंडळ, वारकरी भजन मंडळ, सावता माळी भजन मंडळ,हरिपाठ भजन मंडळ, हनुमान भजन मंडळ, बचत गटाच्या सी. आर.पी.वर्षाताई भोले व सर्व महिला बचत गट, न्यू उत्साही गणेश मंडळ ,

बाल दुर्गा मंडळ तर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना तसेच शहीद झालेल्या सैनिकांना तसेच वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्या सर्व व्यक्तींना सदर कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली व राष्ट्रवंदनींनी कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री.दिलीप पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप भोले श्री.शंकरभाऊ आत्राम,राजुजी कळमकर महाराज,श्री.राजुजी उचले, श्री. दिपक श्रावने,श्री मधुकरराव बावणे, श्री अजयभाऊ भुरे ,श्री. विनोदभाऊ श्रावने,श्री विनोदभाऊ घुगरे ,श्री.प्रमोद झिबड,मनीष दादा आत्राम श्री सुरेशरावजी भोले, अशोकराव भोले,प्रतीक भोले आदर्श भोले (पोलीस पाटील) आशिष पाटील,सचिन घुमडे, राहुल पाटील, महेंद्र पाटील,राजू शं.श्रावने, महेंद्र भोले, अनिल भुरे, संकेत भोले,बालगोपाल,महिला,पुरुष व इतर समस्थ गावकरी मंडळींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here