Home Breaking News समुद्रपूर तहसीलदार यांना महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचे संविधान संरक्षण समिती द्वारे निवेदन...

समुद्रपूर तहसीलदार यांना महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचे संविधान संरक्षण समिती द्वारे निवेदन .!

0
65

राजू कांबळे

तालुका प्रतिनिधी

समुद्रपुर

समुद्रपूर. : आज दिनांक : 08 एप्रिल 2025 रोजी वर्धा जिल्ह्यातील ता. समुद्रपुर शहरातून शांतता पूर्वक मोर्चा, भव्य रॅली काढीत तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना बुद्धगया मध्ये असलेले स्थापित महाबोधी विहारावर काही असंविधानिक संघटनेने कब्जा केलेला आहे. याकरिता महाबोधी विहार मुक्त करण्याकरिता बुद्धिस्ट सामाजिक संघटनाद्वारे आंदोलन करीत आमरण उपोषणाची सुरुवात 54 दिवसापासून भंते संघमित्रा यांनी केली. या आंदोलनाचे सविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राकेश उरकुडे यांनी जाहीर निवेदन दिले आहे.

 

महाबोधी विहार असामाजिक, असंविधानिक संघटनेच्या कब्जात असलेले विहार मुक्त करण्याकरिता संविधान संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राकेश उरकुडे यांनी जाहीर समर्थन दिले असून निवेदनामध्ये मागणी केली आहे की महाबोधी विहार बुद्धगया येथील BT ACT 1949 रद्द करण्यात यावे, संविधान आर्टिकल 26 नुसार धार्मिक स्थळावर त्याच धर्माच्या लोकांचा अधिकार व नियंत्रण असते.हे सर्व अधिकार बुद्दिष्ट लोकांना परत मिळावे,

महाबोधी विहार असंविधानिक कब्जातून मुक्त करून बुद्धिस्ट लोकांना सोपविण्यात यावे, महाबोधी विहार BTMC कमिटी मध्ये सर्व सदस्य बुद्धिस्ट यांची नेमणूक व्हावी, महाबोधी विहार परिसरामध्ये काम करणारे लोक सर्व बुद्धिस्ट यांचेवर सर्व जबाबदारी सोपविण्यात यावी, महाबोधी विहार मध्ये असंविधानिक प्रकारे ठेवलेल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्तींना सन्मानपूर्वक काढून पूर्वस्थापित जागेवर पाठविण्यात यावे.

 

या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, थायलंड, भूतान, जपान येथील भंते व उपासक यांनी समर्थन देऊन आवाज बुलंद केलेला आहे

 

तहसीलदार यांना निवेदन सादर करताना संविधान संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय किन्नर एकता परिषद नवी दिल्लीचे राकेश उरकुडे, सोमानंद भंतेजी (राष्ट्रीय प्रभारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिक्षू संघ), राजश्री इंगळे (संविधान संरक्षण समिती राष्ट्रीय संयोजक), नरेश ठोंबरे ओबीसी जन एकता संघ महाराष्ट्र संयोजक, डी.एम. कांबळे भूतपूर्व महासचिव बामसेफ तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष SDPI, प्रवीण गौरकर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष समुद्रपूर, महेश मुडे राष्ट्रीय सयोजक ओबीसी एकता विचार मंच, यशवंत पाहुणे राष्ट्रीय सयोजक ओबीसी एकता संघ जिल्हा संयोजक, गोकुळ तळवेकर ओबीसी एकता संघ तालुका सयोजक समुद्रपुर, निशा नायक राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय किन्नर एकता परिषद नई दिल्ली, आशिष पेंदाम आदिवासी विचार मंच – सामाजिक कार्यकर्ता, संजय महाकाळे संविधान संरक्षण समिती तालुका प्रभारी समुद्रपूर, राजू धाबर्डे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष तालुका समुद्रपूर, राजु गणवीर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष समुद्रपुर, राहुल लोहकरे,सुदेश जवादे बीएसपी जिल्हा प्रभारी वर्धा यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here