Home Breaking News हिंगणघाट च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंत्रालयात आढावा बैठक सपन्न..! ...

हिंगणघाट च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंत्रालयात आढावा बैठक सपन्न..! महाविद्यालय बांधकाम निर्मिती संबंधित वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केले आदेश.!

0
40

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

हिंगणघाट (जाम) येथे कार्यसम्राट आमदार श्री. समिरभाऊ कुणावार यांनी खेचून आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचे बांधकाम व इतर बाबींचा आढावा घेण्याकरिता आपल्या दालनात बैठक घ्यावी अशी आग्रही विनंती मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना दि. 28 जानेवारी 25 रोजी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी एका पत्रद्वारे केली होती.त्या अनुषंगाने आज मुंबई येथे मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या दालनात हिंगणघाट शासकीय महाविद्यालय बांधकाम व इतर बाबींचा आढावा घेऊन बैठक संपन्न झाली.या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तातडीने उभारणी करण्यासाठी पुढील कार्यवाहीस मंत्री हसन मुश्रीफ यांच्याद्वारे प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे,बँक अकॉउंट काढण्याचे, डीपीआर तयार करन्याचे , निधी ची तरतूद करण्याचे आदेश करण्यात आले तसेच सोबतच नर्सिंग कॉलेज व कॅन्सर हाऊस्पिटल निर्माण करण्याची सुद्धा सकारात्मक चर्चा करण्यात आली.व या सकारात्मक आढावा बैठकीने कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मजबुतीने उभारण्यासाठी या आदेशाने पुन्हा एकदा भरारी मिळाली आहे,हे विशेष,यावेळी बैठकीत चर्चेदरम्यान वर्धा जिल्हा पालकमंत्री पंकज भोयर साहेब, आमदार समिरभाऊ कुणावार साहेब, राजू गंधारे, सचिन धारकर, अमोल सोनटक्के व सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई धीरनकुमार, आयुक्त वैद्यकीय शिक्षणविभाग मुंबई राजीव निवतकर, जिल्हाधिकारी वर्धा, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई चंदनवाले,उप सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, श्री. अंभोरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा, श्री. नामदेव कामडी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट, व इतर संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here