प्रमोद झिबड
गिरड विशेष प्रतिनिधि
समुद्रपुर.
![]()
वर्धा जिल्हा समुद्रपुर तालुक्यातील वायगाव हळद्या येथे दि. 08 मार्च 2025 ला जागतिक महिला दिननिमित्त सन्मान स्त्री शक्तिचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत वायगाव (हळद्या) सौ.अर्चनाताई तपासे मॅडम यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस दीप प्रजवलन व अध्यक्ष सौ. रूपालीताई यो.वैद्य यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांचे फोटोला पुष्प माला अर्पण करण्यात आले.सचिव तपासे मॅडम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली.
CRP वर्षाताई भोले, CRP वैशालीताई गोडबोले, व महाकाळकर ताई, चांभारेताई, मोगरेताई,पाटीलताई, इत्यादी गावातील सर्व महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आणि उ. प्रा.शा. वायगाव(ह.)शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. योगिराज वैद्य यांनी कायक्रमाचे आभार व्यक्त केले.


