राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समूद्रपुर.
समुद्रपूर : बुद्धगया मध्ये असलेले स्थापित महाबोधी विहारावर काही असंविधानिक संघटनेने कब्जा केलेला आहे. याकरिता महाबोधी विहार मुक्त करण्याकरिता बुद्धिस्ट सामाजिक संघटन द्वारे आंदोलन करीत आमरण उपोषणाची सुरुवात 16 दिवसापासून भंते संघमित्र यांनी केली. या आंदोलनाला संविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राकेश उरकुडे यांनी जाहीर समर्थन केले आहे.
महाबोधी विहार असामाजिक, असंविधानिक संघटनेच्या कब्जात असलेले विहार मुक्त करण्याकरिता समुद्रपूर येथील तहसीलदार यांना संविधान संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राकेश उरकुडे यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनामध्ये मागणी केली आहे की महाबोधी विहार बुद्धगया येथील BT act 1949 रद्द करण्यात यावे, संविधान आर्टिकल 26 नुसार धार्मिक स्थळावर त्याच धर्माच्या लोकांचा अधिकार व नियंत्रण असते. हे सर्व अधिकार बुद्धिस्ट लोकांना परत मिळावे. महाबोधी विहार असंविधानिक कब्ज्यातून मुक्त करून बुद्धिस्ट लोकांना सोपविण्यात यावे, महाबोधी विहार BTMC कमिटी मध्ये सर्व सदस्य बुद्धिस्ट यांची नेमणूक व्हावी, महाबोधी विहार परिसरामध्ये काम करणारे लोक सर्व बुद्धिस्ट यांचेवर सर्व जबाबदारी सोपविण्यात यावी. महाबोधी विहार मध्ये असंविधानिक प्रकारे ठेवलेल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्तीना सन्मानपूर्वक काढून पूर्वस्थापित जागेवर पाठविण्यात यावे.
या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून अमेरिका ,थायलंड, भूतान, जपान येथील भंते व उपासक यांनी समर्थन देवून आवाज बुलंद केला आहे.
तहसीलदार यांना निवेदन सादर करताना संविधान संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय किन्नर एकता परिषद नवी दिल्ली चे राकेश उरकुडे, राहूल लोहकरे, राजु गणवीर, राजु कांबळे, राकेश गजभिये,संजय महाकाळे, सरिता लोहकरे, गणेश दांडेकर,अभिलाष झांबरे, ज्ञानेश्वर शंभरकर, प्रतिक गणवीर,अंकुश तामगाडगे, , विजय म्हैके, यांची उपस्थिती होती.


