Home Breaking News रक्तदान करुन जीवनदान द्या : डॉ मिनाक्षी गांधी..! विद्या विकास महाविद्यालयात...

रक्तदान करुन जीवनदान द्या : डॉ मिनाक्षी गांधी..! विद्या विकास महाविद्यालयात नेत्रदान व रक्तदानवर जनजागृती कार्यक्रम.!

0
48

 

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधि 

समूद्रपुर.

 

समुद्रपूर : स्थानिक विद्या विकास महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागां अंतर्गत नेत्रदान जनजागृती , रक्तदान जनजागृती, व आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोरचंद्र रेवतकर होते प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.नयना तुळसकर उपस्थित तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथील नेत्रचिकित्सक डॉ. पूजा जारूडे, डॉ मिनाक्षी गांधी, माधुरी भोयर उपस्थित होत्या सोबतच आरोग्य सेविका रोहिणी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मेघश्याम ढाकरे, आरोग्य तपासणी समितीच्या डॉ.अर्चना भेंडे उपस्थित होत्या

नेत्रदानाचे महत्त्व सांगताना डॉ.पूजा जारूडे म्हणाल्या ज्यांना दृष्टी नाही त्यांचे जीवन अंधारमय आहे त्यांना अंधारात जगावे लागते त्याच बरोबर जनमानसात काही अंधश्रद्धा सुद्धा आहे की नेत्रदान केल्याने पुढील जन्मात आंधळा असते असे काहीही नाही तेव्हा नेत्रदान करून त्यांचे जीवन प्रकाशमय करा व दानामध्ये श्रेष्ठदान हे नेत्रदान मानले जाते असे मत व्यक्त केले तर डॉ.मिनाक्षी गांधी यांनी रक्तदान च्या संदर्भात बोलताना म्हणाल्या रक्तदान केल्यावर तीन व्यक्तीच्या आयुष्याला जीवनदान मिळन्यास मदत होते. रक्तदान केल्याने दुसऱ्या ला जीवनदान मिळतेच परंतु आपल्या शरीरात सुद्धा नवीन रक्तयेते व काही व्याधी सुद्धा दूर होतात तेव्हा रकदान चे दोन्ही फायदे आहे व म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे व प्रत्येक युवकांनी हे केले पाहिजे असे मत व्यक्त करतानाच नेत्रदान सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. दृष्टीसाठी नेत्रदानाचा प्रसार आणि प्रचार करणे आवश्यक आहे.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्यडॉ. रेवतकर यांनी नेत्रदान रक्तदान याविषयी माहिती देत त्यांनी सुद्धा प्रत्येकांनी नेत्रदानाचा संकल्प केला तर आपल्या देशातील दृष्टीहिनाची संख्या सोबतच त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे इच्छुकांना नेत्रदाना चा संकल्प करण्यास प्रवृत्त करत विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. नेत्रदाना विषयी महत्व सांगत त्यांनी परिवारातील सदस्यांना सुद्धा नेत्रदान करण्यास प्रेरित करा आणि आपण ही नेत्रदानाचा फॉर्म भरून देण्यासाठी त्यांनी आवाहन केलं. उपप्राचार्य डॉ. नयना शिरभाते ( तुळसकर) यांनी सुद्धा नेत्रदान व रक्तदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे सांगत, स्वतंत्रवीर सावरकर याच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. मेघश्याम ढाकरे यांनी केले, संचालन डॉ.स्वाती येवतकर यांनी केले तर आभार आरोग्य तपासणी समितीच्या समनव्यक डॉ. अर्चना भेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रीती निजाम, प्राशीतल अवघडे, डॉ नितीन आखूज, राहुल पवार, प्रा राजू बाभुलकर, यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करिता महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here