Home Breaking News माहूर गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने उपोषण सोडले..!

माहूर गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने उपोषण सोडले..!

0
47

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

माहूर : – तांदळा येथील माजी सरपंच देविसिंग राठोड यांनी मुस्लिम समाजाच्या स्मशान भूमी च्या वाल कंपाऊंड चे काम जून 2022 मध्ये पूर्ण केले. सहाय्यक अभियंता, जिल्हा परिषद नांदेड यांनी काम चांगले व पूर्ण केल्याचे पत्र दिले. मोजमाप पुस्तिका ( एम बी) नोंद केली. सदर कामाचे बिल तांत्रिक कारणामुळे मिळाले नव्हते. कामाचे सहा लक्ष रुपये आता प्राप्त झाले असून देविसींग राठोड यांना मिळाले नव्हते. हे बिल त्वरित मिळावे यासाठी. पंचायत समिती समोर चे उपोषण गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत ला वर्ग केल्याने सदर उपोषण मागे घेतले आहे. यासाठी फिरोज दोसाणी नगराध्यक्ष माहूर, सामाजिक कार्यकर्ता मनोज किर्तने, माजी उप सभापती आनंदा दुमारे आदींनी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांचेशी चर्चा करून प्रश्न सोडवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here