प्रमोद झिबड
गिरड विशेष प्रतिनिधि
समुद्रपूर .
![]()
समुद्रपुर. दिनांक १९/०२/२०२४.श्री हनुमान संत गजानन महाराज व दुर्गा माता देवस्थान,समुद्रपूर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी ( मेघे) व शरदपवार दंत महाविद्यालय व रुग्णालय सावंगी (मेघे) पी.व्ही.टेक्सटाईल जाम व कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवा निमित्त भव्य मोफत सर्व रोग निदान व उपचार व शिबिर आयोजन करण्यात आले होते.
![]()
शिबिराची उद्घाटन खासदार अमर बाबू काळे यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमात प्रामुख्याने अध्यक्ष स्थानी डॉक्टर निर्मिषबाबू कोठारी प्रमुख पाहुणे म्हणून अतुलभाऊ वांदिले सुनील राऊत समुद्रपूर स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर उपस्थित होते.आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉक्टर हेमंत सर व त्यांच्या कर्मचारी आरोग्य शिबिर यांच्या सहकार्याने पार पाडले या आरोग्य शिबिरात 160 रुग्णांनी लाभ घेतला गंभीर असलेल्या आजारावर सात लोकांना रेफर करण्यात आले त्यांना मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे.
या शिबिराचे संचालन मनीष गांधी तर प्रास्ताविक लहानुजी गांजलवार (गुरुजी) व आभार प्रदर्शन अमोल झाडे यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता राजेश कासवा नारायण डगवार नितीन डगवार गजानन डगवार प्रकाश इखार पंडित दिवाकरजी पांडे यांनी अतत परिश्रम घेतले.


