Home Breaking News जिल्हा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात गिरड कन्या शाळा व गिरड बिटांनी...

जिल्हा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात गिरड कन्या शाळा व गिरड बिटांनी मारली बाजी.!

0
40

राजु कांबळे 

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपुर.

खेळामुळे जीवन समृद्ध होते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात खेळाला अमूल्य स्थान दिले पाहिजे–! मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. जितीन रहमान

समुद्रपुर: नुकत्याच पार पडलेल्या वर्धा जिल्हास्तरीय खेळ व सांस्कृतिक स्पर्धा मध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीही समुद्रपूर तालुक्याचे नेतृत्व दाखविणाऱ्या गिरड बिटाने आपले वर्चस्व कायम राखले. या स्पर्धा अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा द्वारा विद्यार्थ्यांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात लंगडी, कबड्डी, खो-खो थाळीफेक, गोळा फेक, धावणे, बुद्धिबळ,लांब उडी इत्यादी खेळाचा समावेश होता.

सदर स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड येथील विद्यार्थिनींनी स्वतःचे सामूहिक कसब व कर्तृत्व सिद्ध करीत लंगडी या खेळांमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले त्याचबरोबर खो – खो या सामूहिक खेळामध्ये सुद्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड येथील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्कृष्ट कामगिरीने जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांकाच्या बक्षिकाचे मानकरी ठरल्या. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड येथील विद्यार्थिनींनी कु. श्रावणी श्याम गाठे हिने थाळीफेक या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले.

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा गिरड प्रमाणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फरिदपुर येथील मुलांनी लंगडी या सामूहिक क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताडगाव येथील मुलांनी खो-खो या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला. समाविष्ट सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थि खेळाडूंचे, सर्व कोच प्रशिक्षक शिक्षक, शिक्षिका यांचे सर्व स्तरावरून कौतुक,गुणगौरव व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या बक्षीस समारंभात माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वर्धा- श्रीमती नितू गावंडे मॅडम यांनी व्यक्तीचा सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्व विशद केले.

समुद्रपुर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री. अशोक जी गीद्देवार साहेब, विस्तार अधिकारी माननीय श्री. ललित कुमार बारसाकडे, केंद्रप्रमुख गिरड चे माननीय श्री. अशोक जी आडे सर, विषय तज्ञ माननीय श्री. श्रीकांत जी कावटे सर, विषय तज्ञ अनिताताई उगे मॅडम, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक कन्या शाळा गिरड येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ. माया ताई चाफले, विषय शिक्षक श्री. दिलीप महाजन सर तसेच शिक्षिका कु. नंदा पारीसे, सौ.माया सवाई, कु. मनीषा जांभूळे, कु. सीमा शेख, कु. सुषमा डफ व सौ. भारती ढगे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फरीदपूर येथील मुख्याध्यापक माननीय श्री. शेंडे सर व सर्व शिक्षक वृंद, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताडगाव येथील मुख्याध्यापक माननीय श्री. कलाम सर, व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थी खेळाडू च्या उत्कृष्ट कामगिरी बाबत व यश प्राप्त केल्याबाबत कौतुक करून अभिनंदन केले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी या कठीण यशाचे श्रेय पालक वर्ग शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाला देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here