Home Breaking News गुरुकुल विद्यानिकेतन चा विद्यार्थी साहिल निरटकर याची राष्ट्रीय स्तरावर झेप.!

गुरुकुल विद्यानिकेतन चा विद्यार्थी साहिल निरटकर याची राष्ट्रीय स्तरावर झेप.!

0
44

 

 

सुरेश भगत

शहर प्रतिनिधी 

समुद्रपुर

स्थानिक गुरुकुल विद्यानिकेतन हायस्कूल देवळी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी साहिल संजय निरटकर याने फुटबॉल मध्ये राष्ट्रीय स्तरावर झेप घेत शाळेचे व देवळी शहराचे नाव उंचावले आहे. ‘ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन’ द्वारा आयोजित ‘अंडर 17 एलाईट लीग 2024-25 या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेकरता साहिलची निवड झाली आहे. या स्पर्धा दिनांक 3 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत असून या स्पर्धेचे सामने मंगलोर, बेळगाव व इतर ठिकाणी होणार आहेत. साहिल हा ‘बेळगाव युनायटेड फुटबॉल अकॅडमी’ या क्लब तर्फे मिड फिल्डर म्हणून खेळणार आहे. साहिल आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे यांना देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here