Home Breaking News पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार 2025 पुरस्काराने सचिन वैद्य सन्मानित..! वर्धा व...

पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार 2025 पुरस्काराने सचिन वैद्य सन्मानित..! वर्धा व नागपूर येथील पदाधिका-यांनी या अधिवेशनाचे यशस्वी केले आयोजन.!

0
51

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

एक कॉल , प्रॉब्लेम स्वाल ही भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी मांडली.

महिलांनी विभागीय उपाध्यक्ष सुवर्णा सचिन वैद्य यांच्या भव्य सत्कार.

वर्धा जिल्ह्यामधील देवळी शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती युवा पत्रकार तथा समाजसेवक सचिन निर्मला जगनराव वैद्य यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करीत सत्कार देखील झाला. पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर असणारे तथा वंचित घटकांना न्याय देण्यासाठी लढा उभारणे युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रमुख उद्दिष्ट आहे असून सदर अधिवेशन कार्यक्रम नागपूर येथील वनामतीच्या वसंतराव नाईक भव्य सभागृहात महाराष्ट्र राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन (2025) राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांचे अध्यक्षतेखाली मराठी वृत्तपत्राचे जनक तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील जिल्हा , तालुका कमिटीचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अतिथींच्या हस्ते युवा ग्रामीण पत्रकार संघ दिनदर्शिकेचे विमोचन प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ६ जानेवारी 2025 ला पार पडले. त्यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नव स्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य यांना रंगमंचावर राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते शाल , सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अतिथी प्रभात अवठणकर , लक्ष्मण टेकाळे , विनोद कन्नाके , युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विभागीय उपाध्यक्ष सुवर्णा सचिन वैद्य , जिल्हाध्यक्ष आर्यन कांबळे , कार्याध्यक्ष तुषार रेड्डीवार , महिला अध्यक्ष रोहिणी बाबर , सचिव शंकर परचाके , आशिष जाचक व सर्व मान्यवर उपस्थित होते. अनेकांनी आपले विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सांगितले की जवळपास 35 हजार सदस्य जोडले आहे महाराष्ट्रातच नाही तर भारतातील बारा राज्यात युवा ग्रामीण पत्रकार संघाने पदार्पण केले आहे व दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यालय लवकरच स्थापन होणार आहे असे अधिवेशनात सांगितले. वर्धा व नागपूर येथील पदाधिका-यांनी या अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केले होते. अधिवेशनास राज्यातील विविध भागातून आलेल्या पुरुष व महिला पत्रकारांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी बाबर व संचालन विद्या नरड तर आभार हर्षाली बावणे यांनी मांडले. तसेच स्वराज , सिद्धी व इतर लहान चिमुकल्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here