मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
मांडगाव :- कस्तुरबा नर्सिंग स्कूल व श्री. मोतीरामजी शिंदे ज्युनिअर व सीनियर कॉलेज मांडगाव च्या वतीने नववर्ष स्वागताचा कार्यक्रम , ANM व GNM Batch (2021-22)चा निरोप समारंभ घेण्यात आला. अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. मोतीरामजी शिंदे होते.तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रविणा मिसार (वैद्य.अधिकारी हिंगणघाट , डॉ. मीनाक्षी वावरे (स्त्रीरोग तज्ञ उपजिल्हा रुग्णालय, हिंगंणघाट) डॉ. श्रेयशी शिंदे( वैद्य.अधिकारी सामान्य रुग्णालय, वर्धा) सौ. सुरेखा लांडगे, सौ. शिला जयपूरकर, संस्थेचे सचिव श्री. सुनील शिंदे, संचालिका सौ.सुप्रिया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तवणा प्राचार्या अश्विनी क्षीरसागर यांनी तर प्रास्ताविक भाषण संचालिका सुप्रिया शिंदे यांनी केले. डॉ. मिसार यांनी “नर्स व ब्रदर यांना हॉस्पिटल मध्ये.प्रात्यक्षिक शिक्षण कडे जास्त लक्ष देऊन आपल्या कार्यामध्ये चांगली प्रगति करावी. ”असे सांगितले डॉ. मीनाक्षी वावरे यांनी विद्यार्थ्यांना .मार्गदर्शन केले. यावेळी एएनएम व जीएनएमn21.22बॅच विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देवून निरोप देण्यात आला. संस्थेच्या वतीने डॉ.प्रविणा मिसार डॉ. मीनाक्षी वावरे यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
आचल पर्बत, ज्योस्तना पाटील,ट्विंकल कोडापे,अंकिता नगराळे या विद्यार्थिनींनी त्यांच्या शैक्षणिक काळातील अनुभव व्यक्त केला. सुनील शिंदे व तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आरती सवसाकडे यांनी अप्रतिम गीत सादर केले. तसेच सुनील शिंदे सुप्रिया शिंदे यांनी “चंद्र आहे साक्षीला” हे अप्रतिम गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यानी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रेरणा तेलंग, पुजा मते, रिधिमा जुगनाके, अपूर्वा खंडाते, गायत्री लांडगे, शुभांगी भगत, नयना तराळे, आरती सवसाकडे,प्रतीक्षा नेवारे यांनी सामूहिक नुत्य सादर केले. द्वितीय वर्षाची तनया आडे हिने लावणी सादर केली. प्रथम वर्षाचा सन्नी कुत्तरमारे ह्यांनी नुत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यानी अस्सल ग्रामीण भागातील पांगयाचे जेवण स्वतचा हातांनी तयार केले त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा पाहुणे व रुषिका दिवे यांनी केले तर आभार प्रा . सुवर्णा कांबळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते करिता प्रा. राहुल कोसे, वैशाली सातपुते,, चेतन पिसे, विक्की घुसे, गौरव कांबळे, यश वनकर, श्वेता घुसे,जानवी केमये, स्नेहल मेश्राम,श्वेता चौधरी, वैष्णवी दैवलकर, समृद्धी पाटील.यांच्या सह अनेकांनी सहकार्य केले.


