Home Breaking News विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात आला नववर्षाचा स्वागत उत्सव..! ...

विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात आला नववर्षाचा स्वागत उत्सव..!   मुख्याध्यापकांनी दिले विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे. 

0
56

राजु कांबळे

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपुर.

 

समुद्रपूर : आज दिनांक 01 जानेवारी 2025 ला विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीने वर्ग कक्षा मध्ये नववर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य श्री. एस. व्हीं.तडस सर यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक वक्ते श्री. धुळे सर,श्री. महाकाळे सर, श्री. गायकवाड सर,श्री. झाडे सर, श्री. येनोरकर सर, चांगले मॅडम तसेच विशेष उपस्थिती मध्ये श्री. कांबळे सर, श्री. अंकित तडस सर, कुमारी अग्निहोत्री मॅडम, बंडुजी पाल, भैयाजी सातपुते, संजय कुमार गवतेजी, दोसील बावणे, संजय भाऊ बाभुळकर, शशिकांत वानखेडे जी यांचे उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवा संकल्प घेऊन तो पूर्णत्वास नेण्याचा कानमंत्र दिला यावेळी शाळा मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत आदर्श जीवनशैली कशी विकसित करावी याची प्रेरणात्मक उदाहरणे देऊन मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचालन श्री. के आर. बारोकर सर यांनी करीत उपस्थित सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here