मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट
हिंगणघाट :- वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवडघाट शिवारात अवैध्यरित्या जेसीबीच्या साह्याने वृक्षतोड सुरू होती त्याची माहिती वन विभागाला मिळतात अवैध्य वृक्षतोड थांबून संबंधितावर कारवाई करून जेसीबी ताब्यात घेण्यात आला हे कारवाईत रविवार दुपारी दोन वाजताच्या दरम्यान करण्यात आली हिंगणघाट परिक्षेत्राचे वन अधिकारी व कर्मचारी गोष्टीवर असताना त्यांना कवडगाव शिवारात दाबा रेल्वे लाईन जवळच्या भागात रेल्वे विभागाकडून विनापरवानगी हवेत दरीच्या जेसीबीच्या साह्याने वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनात आले जेसीबी चालक व रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्याकडे वृक्षतोडीबाबत परवानगी विचारली असता त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे वन विभागाकडून महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 03 अन्वये वन गु न्हा दाखल करण्यात आला तसेच वृक्षतोडीकरिता वापरलेल्या जेसीबी ताब्यात घेण्यात आली ही कारवाई सहाय्यक उपवन संरक्षक अमरजीत पवार वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांच्या मार्गदर्शनात वनपाल प्रमोद राऊत दीपक वैरागडे योगेश पाटील यांनी केली


