अकलुज मध्ये विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले..!

0
6

चंद्रकांत सु. गायकवाड 

  जिल्हा प्रतिनिधी 

     सोलापूर

 

मतदारसंघातील विजय चौक, अकलूज येथे सकल हिंदू समाज आयोजित विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले, यावेळी उपस्थित होतो.

 

हिंदू समाजात एकता, संघटन आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जात, पंथ, भाषा या सर्व भेदांना मागे ठेवत धर्म, संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.

या प्रसंगी वारकरी कीर्तनकार, प्रबोधनकार तथा व्याख्याते ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर (सांगली) यांनी हिंदू समाज प्रबोधन विषयावर मार्गदर्शन केले, तर प.पू. स्वामी श्रीपाद तीर्थ महाराज यांनी आपल्या आशीर्वचनातून समाजाला एकजुटीचा संदेश दिला. यावेळी माळशिरस तालुक्यातील जागरूक हिंदू समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here