राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर.
समुद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रोजगार संघ नागपूरच्या वतीने महाराष्ट्र मध्ये पर्यावरणाशी निगडित अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मंडळ किंवा संस्थेला वृक्ष सखा हा पुरस्कार देण्यात येतो.
राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील रोजगार प्रशिक्षण केंद्र ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण संस्था, नागपूर येथे मिशन दहा हजार वृक्ष लागवड जन अभियान मंडळांच्या कार्याची दखल घेत ” वृक्ष सखा पुरस्कार ” 10000 वृक्ष लागवड यांना अभियान गिरड यांना देण्यात आला. या पुरस्कारामध्ये दहा हजार रुपयाचा धनादेश, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मिशन दहा हजार वृक्ष लागवड गिरड येथील सदस्यांचा गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. कमल किशोर फुटाणे उपायुक्त नागपूर, डॉ. रमेशजी कुलकर्णी संपादक पुण्यनगरी, प्राचार्य अभयजी बनसोड पंचायत प्रशिक्षण केंद्र नागपूर, रोजगार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक संजयजी नाथे ग्रामगीताचार्य, उद्धवजी साबळे सरचिटणीस या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक विष्णू ब्राह्मणवाडे, मंथन भांदककर, आदेश चौधरी, पूनम ब्राह्मणवाडे, वैभव कुंभलकर, भावेश ब्राह्मणवाडे, मुक्ताई ब्राह्मणवाडे या सर्वांनी उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारला.
या विजेत्या मंडळाचे गिरड ग्राम वाशी यांनी व सर्व स्तरावरून अभिनंदन केले आहे.