सुरेश भगत
शहर प्रतिनिधी
समुद्रपुर
दि.31 डिसेंबर.वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कृष्णापेठ हनुमान देवस्थान येथे असंख्य महिला, पुरुष, भावीक श्रद्धेने येत असतात. हे हनुमंताचे देवस्थान पुरातन आहे. कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.मार्गशीष महिन्यात पहिल्या सोमवारपासून यात्रा महोत्सवाला प्रारंभ होतो. मागील 85 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेचे आजही जतन होते. शिजलेल्या पानग्याचा नैवेद्य केल्यानंतर इच्छापूर्तीचे साकळे हनुमंताला घातले जाते. येथील हनुमंताची मूर्ती नवसाला पावणारी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.
याप्रसंगी आज देवस्थान कमिटीच्या वतीने श्री अतुल वांदिले यांच्या सत्कार करण्यात आला. आयोजक समितीचे केलेला सत्कार स्वीकारून अतुल वांदिले यांनी आभार मानले.
यावेळी तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटिल, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुणवंता कोटेकार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,गजानन शेंडे, सरपंच वैशाली लोखंडे, गणेश वैरागडे,अमोल बोरकर,अमोल मेंढुंले,सोहम शेंडे, प्रफुल आंबटकर आदी उपस्थित होते.