सुरेश भगत
शहर प्रतिनिधी
समुद्रपुर
5 जानेवारी 2025 ला बुलढाणा जिल्ह्यात माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्काराचे आयोजन
बुलढाणा जिल्ह्यात माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्काराचे दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 12 वाजता कार्यक्रमाचे ठिकाण शिक्षक संघ पतसंस्था हॉल 40 मलकापूर येथे आयोजन करण्यात आले.त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील देवळी गावातील सर्वसामान्य घरातील विविध सामाजिक संघटना तसेच सामाजिक चळवळीत कार्यतत्पर नेहमी अग्रमी संयमी योगदान रुग्णसेवक पत्रकार सचिन जगनराव वैद्य हे सामाजिक क्षेत्रातील विविध जबाबदारी प्रामाणिकपणे नेहमी पार पाडत दिसतात.म्हणून सचिन वैद्य यांना 2025 चा आदर्श समाज रत्न पुरस्कारासाठी निवड केली.ही निवड संस्थापक अध्यक्ष विवेक सुभाष राजापूरे यांनी केली आहे. म्हणून वर्धा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे आई-वडील मित्रपरिवार समाज नागरिकांनी सचिन वैद्य यांना पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतूक करत आहे तसेच शुभेच्छा व्यक्त करीत आहेत. सलग सात वर्षापासून चाललेली वाटचाल संस्थेची स्थापना 3 जुलै 2018 संस्थेचे सामाजिक कार्य संस्था स्थापन झाल्यापासून आरोग्य रोजगार निर्मिती महिला सक्षमीकरण मुख्यतः या तीन विषयावर काम करत आहे. गोरगरीब गरजूंसाठी तसेच शहरी व ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून सेवा देणे व आरोग्य शिबिराचे आयोजन करून रोजगार निर्मिती बेरोजगार युवकांसाठी स्थानिक ठिकाणी किंवा बाहेरगावी जाणाऱ्यास जॉब उपलब्ध करून देणे व रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे तसेच महिला वर्गासाठी उद्योग प्रशिक्षण शिबिर आयोजन करणे महिला सक्षमीकरण वाढत्या महिला अत्याचार रोखण्यासाठी सक्षम महिला सुरक्षित महिला या विषयावर कार्यशाळा घेणे तसेच मुख्यतः विषयावर सखोल चर्चासत्र आयोजन करणे इत्यादी उपक्रम करीत समाजाला संदेश दिला आहे.