सुरेश भगत
शहर प्रतिनिधी
समुद्रपुर
समुद्रपूर – भारताचे अर्थशास्त्र तज्ञ,पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. यांचे निधनाने संपूर्ण देशवासीयांना दुःख झाले.
समुद्रपूर येथील झेंडा चौक येथे पूर्व प्रधानमंत्री यांना श्रद्धांजली दिली गेली.श्रद्धांजली सभेत अध्यक्षता माजी सभापती डॉ.रामकृष्ण खुजे होते. सभेत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, राष्ट्रीय कांग्रेस के तहसील अध्यक्ष गुणवंत कोठेकर, रविंद्र लांबट सर, गिरधर ठवरी, प्रशांत बाभुळकर, गणेशनारायण अग्रवाल, भोला भोयर, प्रफुल महंतारे सर, गजानन डगवार, देवराव खोब्रागडे, इत्यादी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
श्रद्धांजली सभेत सुरेश वानकर,संजय उरकुडे, विठ्ठल लेडे, केशव भोले, चांगदेव मुंगल, जनार्धन हुलके,राजू चाटे, गोविंदा तुमडाम, प्रकाश आगरे,प्रकाश गिरोले, कवडू मुडे,महादेव नैताम,कवडू झाडे,रामाजी मांडवकर, सह बरेच शहर वासी उपस्थित होते.