कोरपना येथे श्री. संत संताजी जगनाडे महाराज जयंती व प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न. 

0
12

कोरपना (ता.प्र) :– श्री. संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलिक विकास संस्था, कोरपणा यांच्या संयोजनातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्री. संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचे वास्तुपूजन, श्री. संत संताजी महाराज मूर्ती, विठ्ठल रुक्माई मुर्ती व गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कोरपना तालुका तेली समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी प. पु. आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी कीर्तनातून उपस्थितांचे प्रबोधन केले. यावेळी रविवार दिनांक २२ डिसेंबर ला गणपतराव गिरडकर व अंजनाताई गिरडकर यांच्या शुभहस्ते मदिराचे वास्तुपूजन व लोकार्पणसोहळा पार पडला .तर दिनांक २३ डिसेंबर रोज सोमवार ला परमपुज्य आचार्य गजेंद्रजी चैतन्यजी महाराज मधापुरी यांच्या शुभहस्ते आणि परमपुज्य स्वामी चैतन्य महाराज वढा, परमपुज्य खेमराज महाराज पावडे ,यांच्या उपस्थितीत मुर्तींची प्रतिस्थापना करून महाप्रसाद वितरित करण्यात आला.

या प्रसंगी हंसराजजी अहीर राष्ट्रीय मागासवर्गिय आयोग भारत सरकार तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री , मान.संजयभाउ धोटे माजी आमदार,श्री.विजयजी बावने ,नगराध्यक्षा सौ.नंदाताई बावने यासह संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय तैलीक विकास संस्थेचे पदाधिकारी आणि कोरपना तालुक्यातील तेली समाज बंधू भगिनी ,व इतरही नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here