मन्वर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट
शुक्रवार दिनांक 6 .12. 2024 रोजी महात्मा फुले समता परिषद कार्यालय वर्धा येथे बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष मा दिवाकर राव गमे हे अध्यक्षस्थानी होते बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये शेतकरी शेतमजूर युवा यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय समता परिषद मोठा भविष्यात लढा उभारेल असे प्राध्यापक दिवाकर राव गमे यांनी सांगितले.
त्यानंतर तालुका अध्यक्ष व शेतकरी योद्धा अमोल ठाकरे यांना सोबत घेऊन पीडब्ल्यूडी कार्यालय अंभोरे साहेब यांच्याशी शांतीनगर ते रोठा हा रस्ता अतिशय खड्डेमय असल्यामुळे त्यांना या रस्त्याची जाणीव करून देण्याकरिता तसेच नागठाणा रोडवरील रोठा या गावातील स्मशानभूमी जवळील पूल जीर्ण अवस्थेत असल्यामुळे त्याचे बांधकाम होणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याकरिता प्राध्यापक दिवाकर राव गमे तालुका अध्यक्ष अमोल ठाकरे किरण ताई कडू विशाल हजारे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलकंठराव पिसे महिला अध्यक्ष कविताताई मुंगले . माधवी देशमुख विद्याताई मुंगळे विनय डहाके विद्याताई साधनाताई तुषार रेड्डी वार सुरेश भगत हिंगणघाट अध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी सोबत घेऊन त्या रस्त्याची व पुलाची जाणीव करून दिली व लगेच अंभोरे साहेब यांनी रस्त्याची डाग दुजी करण्याचे आश्वासन दिले आणि भविष्यात हा रस्ता आमदार साहेबांकडे नवीन बनवण्याकरिता प्रस्ताव पाठवण्याचे त्यांनी सांगितले तसेच भूमि अभिलेख कार्यालय व ओबीसी विद्यार्थ्यांकरीता वर्धा येथे होत असलेल्या वस्तीगृहाच्या जागेची पाहणी करून त्वरित वस्तीगृह बांधण्याकरिता अथक परिश्रम अखिल भारतीय समता परिषद वर्धा जिल्हा करीत आहे