पोस्टे रामनगर गुन्हे शोध पथकाने गांजा तस्कराचे आवळल्या मुसक्या

0
9

 

चंद्रपूर :- २७ जुन / फिर्यादी पोउपनि मधुकर सामलवार हे दि. २४ /०६/२०२४ रोजी पोस्टे रामनगर येथे हजर असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चंद्रपुर ते नागपुर रोडवरील चंद्रपुर जिल्हा पोलीस वाहतुक शाखेसमोर चे बाजुच्या टॅक्सी स्टॅन्ड जवळ एक माणुस ज्याचे अंगावर फिकट गुलाबी ठिपके फुलबाहयाचे शर्ट, काळ्या रंगाची जिन्स परीधान केलेला उंची अंदाजे ५,१/२ उंचीचा, वय अंदाजे ३३ वर्ष वयाचा इसम त्याचे जवळ गांजा असुन तो गांजाची अवैद्यरित्या बाळगुन विकी करीत आहे अशा विश्वासनिय माहिती वरुन सदर माहीती वरीष्ठ अधिकारी यांना देवुन पोस्टाप व पंचासमक्ष आरोपीस नामे अरविंद वैजनाथ यादव वय ३३ वर्ष, धंदा खाजगी नौकरी, रा. गायत्रीचौक, मुल रोड, इंदिरानगर, चंद्रपुर तह.जि. चंद्रपुर यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळील सिमेंट रंगाचे पिशवी ताब्यात घेवुन ती उघडुन पाहिली असता त्यामध्ये असलेल्या प्लॉस्टीक पन्नीत हिरवट, काळसर झाडपत्ती सारखा, बिजा असलेला उग्रवास येणारा गांजा वजन २ किलो ४७ ग्रॅम कि.अं. २०,४७०/-रुपये किमतीचा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला. त्याचे कृत्य कलम ८ (क), २० (ब), (।।) (ब) एन.डी.पि.एस. अॅक्ट प्रमाणे होत असल्याने फिर्यादिचे लेखी रिपोर्ट वरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा.अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे सपोनी देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा /२२७३ शरद कुडे, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / २४५४ प्रशांत शेंदरे, पोहवा / ११६५ आनंद खरात, नापोशि / २४३० लालु यादव, पोशि / ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि /७८७ रविकुमार ढेंगळे, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि / २५१३ विकास जुमनाके, पोशि / ६९९ विकास जाधव, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, मपोहवा/४६२ मनिषा मोरे यांनी कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here