महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमटीची मोठी कार्यवाही. देवतळे दाम्पत्याचे काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन.

0
15

चंद्रपूर:- २७ जुन / लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्यानंतर कॉग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी रणनिती आखणे सुरु केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मा. मल्लीकार्जुन खरगे यांनी पक्षातील गटाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही अशी भुमीका जाहिर केली आहे. त्याचा एक भाग म्हणून पक्ष विरोधी काम करणाऱ्या चंद्रपूरातील माजी जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे व त्यांचे पती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे सभापती श्री. विजय देवतळे यांची कॉग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीने पक्ष विरोधी काम करणाऱ्या वर कार्यवाही करणे सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष विरोधी काम करणाऱ्या देवतळे दाम्पत्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांसदर्भाचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. विजय देवतळे यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून पक्ष विरोधी भुमिका घेतली होती. त्यासोबतच 2023 मध्ये झालेल्या कृ.उ.बा. समितीच्या झालेल्या वरोरा येथील निवडणूकीत भाजपा शी हात मिळवणी करुन कॉग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे काम केले होते. त्यासोबतच 2024 च्या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणूकीत देखील देवतळे दाम्पत्याची भुमीका पक्ष विरोधी होती. यासर्व पक्ष विरोधी बाबींचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने श्री. विजय देवतळे व डॉ. आसावरी देवतळे यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करुन पक्ष विरोधी काम करणाÚया नेत्यांना संदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here