राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधणाची वार्ता दुखत आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
त्यांच्या वागण्यात नेहमी साधेपणा असायचा. त्यांच्या जाण्याने राज्याने शांत, सुस्वभावी, संयमी आणि मार्गदर्शक नेतृत्व कायमच गामावल असल्याचे भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
मि शिवसेना पक्षात काम केले आहे. त्यावेळी शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मनोहर जोशी हेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वपरिचीत होते. ते कार्यकर्त्यांसाठी सहज उपलब्ध असायचे. त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले. त्यामुळे त्यांना गरिबीची जाण होती.ते मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर चंद्रपूर येथे आले होते. शिवसेनेत काम करत असतांना अनेकदा त्यांना भेटण्याचा योग आला. यावेळी अनेकदा चर्चा व्हायची. शिव सैनिकांप्रती त्यांच्यात तळमळ होती. त्यांच्या जाण्याने राजकारण आणि समाजकारणाची मोठी हानी झाली आहे. असे नेते पून्हा घडणे शक्य नाही असे आपल्या शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.