टुरिस्ट हॉटेलचे मालक के. अशोक राय गजाआड?. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील अवैद्य संपत्ती जप्त(?)

0
42

मुंबई :-  पवई येथील हॉटेल टुरिस्ट चे मालक यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी अटक करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील अवैद्य संपत्ती जप्त होणार असल्याची माहिती विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर दिली असून तश्या अशयाची तक्रार पोलीस आणि म्युनिसिपल कमिशनर ला दिली आहे.

 

पवई येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी वज्रमूठ उगारली असून बेकायदा 14 खोल्या बांधलेल्या आहेत त्या निष्काशीत कराव्यात तसेच अवैद्य पद्धतीने स्टुडिओ जप्त करावा अशी मागणी केली आहे.

 

बेकायदा बांधकामाला आळा घालण्यासाठी कायदे करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र असूनही परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येऊन अवैद्य ताबा करण्याची हिम्मतच कशी करतात? कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात यांची वंशावळ संपत्तीची चौकशी करून अश्या अवैद्य पद्धतीने किती जंगम व स्थावर संपत्ती जमवली आहे याचा तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचांनालय यांना तक्रार देणार असल्याचे डॉ. माकणीकर म्हणाले.

 

कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याकडून आराखडा मंजूर करून घेने गरजेचे आहे. मंजूर आराखडा बांधकाम ठिकाणी प्रदर्शित करणे

महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायद्यानव्ये 1963 च्या कलम 3 प्रमाणे कायद्याने बंधनकारक आहे.

 

कलम 13 प्रमाणे 3 वर्ष शिक्षापात्र दखलपात्र व बिंनजामीन फोजदारी अपराध आहेत. सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय विकास करणे किंवा बांधकाम करणे हा महाराष्ट्र रिजनल आणि टावून प्लॅनिंग ऍक्ट कलम 52 प्रमाणे 3 वर्ष शिक्षापात्र दाखलपात्र व बिंनजामीन फोजदारी गुन्हे आहेत.

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी नमुद कलमानव्ये हॉटेल मालकाला अटक करण्याची मागणी केली असून लवकरच के. अशोक राय गजाआड जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here