Home Breaking News 15 ऑक्टोबर रोजी स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन

15 ऑक्टोबर रोजी स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रॅलीचे आयोजन

0
60

 

 

चंद्रपूर दि. 10: स्टेशन हेडक्वार्टर, कामठीतर्फे सुरेश भट्ट सभागृह, रेशीमबाग ग्राऊंड, नागपूर येथे रविवार, दि. 15 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्याकरीता रेकॉर्ड ऑफिसतर्फे तक्रार केंद्र, ई.सी.एच.एस. स्टॉल, मेडिकल स्टॉल, सी.एस.डी व इतर स्टॉल लागणार आहेत. तरी, जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here