Home Breaking News शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक 30 नोव्हेंबरपर्यंत धान...

शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक 30 नोव्हेंबरपर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

0
65

चंद्रपूर, दि. 10: पणन हंगाम 2023-24 खरीप मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे.

शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2023-24 पासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजेच, दि. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत खरेदी केंद्रावर मुदतीत धान खरेदीसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.

हि आहेत खरेदी केंद्र:

सावली तालुक्यातील श्री. किसान सह.तांदुळ गिरणी मर्या.व्याहाड (बु.), तालुका शेतकी खरेदी विक्री सह.संस्था,नागभिड आणि श्री. गुरुदेव सहकारी राईस मिल कोर्धा ता. नागभीड, चंद्रपूर जिल्हा कृषि औद्यो. सहकारी संस्था, चिमूर आणि चिमूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री नेरी ता. चिमूर, पोंभुर्णा/गोंडपिपरी तालुक्यातील कोरपना ता.ख.वि.समिती, गोंडपिपरी, चंद्रपूर जिल्हा कृषि औद्योगिक सह. संस्था, ब्रम्हपुरी, ब्रम्हपुरी खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था आणि चंद्रपूर जिल्हा कृषि औद्यो. सहकारी संस्था बरडकिन्ही ता. ब्रम्हपुरी, बल्लारपूर, चंद्रपूर व राजुरा तालुक्यातील कोठारी येथील कोरपना ता.ख.वि.समिती कोठारी तसेच मुल व सिंदेवाही तालुक्यातंर्गत नवरगाव सहकारी राईस मिल, नवरगाव आणि सिंदेवाही सहकारी भात गिरणी, सिंदेवाही ही खरेदी केंद्र आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here