Home Breaking News अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप..!

अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप..!

0
2

चंद्रकांत सु. गायकवाड 

जिल्हा प्रतिनिधी 

सोलापूर.

 

अक्कलकोट : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच उपस्थितांना महाप्रसादही देण्यात आला.

 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन आदी साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पोलीस उपअधीक्षक विलास यामावर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, यशवंत इंगळे, संदीप मडीखांबे, सचिन बनसोडे तसेच पत्रकार चेतन जाधव, मारुती बावडे, स्वामीराव गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

गेल्या पाच वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानवांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जात असून, साडी वाटप, पाणपोई, खाऊ वाटप आणि शैक्षणिक साहित्य वितरण अशा उपक्रमांद्वारे समाजोपयोगी कार्य करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी दिली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता रविराज पोटे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे, प्रकाश शिंदे, संकेत शिरसे, नितीन शिवशरण, शिवाजी चौगुले, तसेच उत्सव समिती अध्यक्ष आकाश गावडे, उपाध्यक्ष महेश बनसोडे, प्रवीण ढाले, खाजपा एवळे, संतोष बाळशंकर, माणिक गायकवाड, अमृत सोनकांबळे, बबन गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भीमनगर पंचकमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here