Home Breaking News निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या..!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या..!

0
144

चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

यात दीपक बेले जिल्हा संघटक, भिवराज कुकरा जिल्हा समन्वयक, अभिजीत स्वान जिल्हा उपप्रमुख, अविनाश ऊके विधानसभा प्रमुख चंद्रपूर, या सर्वांचे कार्यक्षेत्र चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ठेवण्यात आले आहेत. याशिवाय उमेश कुंडले बल्लारपूर शहर संघटक, नयन जंगम शहर सहसमन्वयक चंद्रपूर,तेजस गाणार शहर समन्वयक चंद्रपूर, आशिष चौधरी चंद्रपूर शहर संघटक. तसेच अल्पसंख्यांक सेल अंतर्गत अब्बास शेख चंद्रपूर तालुकाप्रमुख, शेख नासिर शेख चंद्रपूर महानगर प्रमुख, सरफराज शेख चंद्रपूर उपमहानगर प्रमुख, असलम शेख महानगर संघटक तर, नावेद शेख चंद्रपूर तालुका संघटक अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सर्वांना नियुक्ती पत्रांचे प्रदान करण्यात आले. यावेळी युवासेना प्रदेश सचिव शुभम नवले, गडचिरोली संपर्कप्रमुख संदीप बर्डे, नागपूर शहर प्रमुख समीर शिंदे, चंद्रपूर जिल्हा प्रमुख एड. युवराज धानोरकर, जिल्हा युती सेना प्रमुख इशिका बुरुकुल, युवा सेना शहर प्रमुख पवन यादव आदी उपस्थित होते.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या शिवसेनेसाठी महत्वाच्या समजल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here