Home Breaking News शिवसेना जिल्हा प्रमुख कामगार नेते बंडू हजारे यांची माणिकगड सिमेंट कंपनीतील प्रशासन...

शिवसेना जिल्हा प्रमुख कामगार नेते बंडू हजारे यांची माणिकगड सिमेंट कंपनीतील प्रशासन विरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार स्थानिक कामगारांचे शोषण व त्यांच्यावर उपासमारीची पाळी विरोधात यांच्या इशारा..!

0
51

गेल्या १४ ते १५ वर्षापासून माणिकगड सिमेंट कंपनीत स्थानिक सुरक्षा रक्षक व स्थानिक कामगाराचे शोषण होत असून माणिकगड कंपनी प्रशासन सेक्युरिटी गार्ड कंपनी नी मिळून सुरक्षा रक्षकाचे ५ ते ६ कोटी रुपये आपसात वाटून खाल्ल्याने सुरक्षा रक्षकावर उपसमारीची पाळी आलेली आहे.

केंद्रीय/महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ किमान वेतन कायद्यानुसार पगार न करता अर्धा पगार देऊन पैशाची लूट केली व १२ १५ तास काम करवून त्यांना जनावरांची वागणूक दिलेली आहे या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कामगार नेते बंडू हजारे यांनी सुरक्षा रक्षक याना न्याय मिळावा म्हणून कायदेशीर रित्या केंद्रीय कामगार सहाय्यक आयुक्त/महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडे दाद मागितली असता केंद्रीय सहाय्यक आयुक्त यांनी कामाचे तास ८ तास करून दिले परंतु मग्रूर माणिकगड कंपनी चे हेड विनय कौशिक यांनी अजूनही त्याना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत नसल्याने आज दिनाक १६/०९/२०२५ रोजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडू हजारे सुरक्षा रक्षकाचा पगार गेल्या अनेक वर्षाचा माणिकगड कंपनी व सेक्युरिटी कंपनी यांनी अपसात वाटून खाल्लेला ५ कोटीचा वरती असल्याने चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा येते माणिकगड कंपनी हेड विनय कौशिक sis सेक्युरिटी कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आता सर्व स्थानिक सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार न्याय कसा मिळत नाही अशी मागणी आपल्या निवेदनात कामगार नेते शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी केलेली आहे

या पुढे सर्व सिमेंट कंपनीत स्थानिक सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगारांना न्याय मिळे पर्यंत लढा सुरू राहील

जय हिंद जय महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here