Home Breaking News दिवाणी न्यायालय, तालुका विधी सेवा समिती, समुद्रपूर व राष्ट्रीय सेवा योजना विद्या...

दिवाणी न्यायालय, तालुका विधी सेवा समिती, समुद्रपूर व राष्ट्रीय सेवा योजना विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपुर येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न..!

0
62

 

गिरड विशेष प्रतिनिधी

प्रमोद झिबड

समुद्रपुर

 

दि. १२ ऑग २५ समुद्रपुर :- मा.दिवानी व फौजदारी न्यायालय, तालुका विधी सेवा समिती,समुद्रपूर व राष्ट्रीय सेवा योजना विद्या विकास महाविद्यालय.समुद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. पी. एल.पाटील. दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष,तालुका विधी सेवा समिती,समुद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर विद्या विकास महाविद्यालय.समुद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणारे उपक्रम व पोक्सो कायदेविषयक माहिती श्री. पी. एल. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. डॉक्टर किशोरचंद्र रेवतकर,प्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.मेघश्याम ढाकरे सर, उपप्राचार्य वि. वि.महाविद्यालय, समुद्रपूर यांनी केले. वकील संघ समुद्रपूर चे वरिष्ठ अधिवक्ता श्री.एम.बी.थुटे, यांनी सायबर लॉ या विषयावर तर श्री. यु.के.गणवीर यांनी भारतीय राज्यघटनेतील विविध तरतुदी.

रॅगिंग कायदा या विषयावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. डॉक्टर प्रकाश तळे सर, यांनी केले. तर आभार प्राध्यापक डॉक्टर स्वाती येवतकर यांनी केले.या कार्यक्रमाला श्री अमरदीप चवरे,सहाय्यक सहकारी अभिभोक्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन ता. वि. से. स. समुद्रपूर, अधिवक्ता संघ व राष्ट्रीय सेवा योजना, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर यांचे द्वारे विद्या विकास कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, समुद्रपूर येथे करण्यात आले होते. यावेळी श्री.उत्तम का. पौळ, क. लिपिक, दिवाणी न्यायालय, समुद्रपूर,श्री. जी. के. फुकट व श्री. आर. सी.एल. येलमुले विधीस्वयंसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांना विविध कायदेविषयक ज्ञान प्राप्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here