गिरड विशेष प्रतिनिधी
प्रमोद झिबड
समुद्रपुर
![]()
दिनांक २४ जुलै २०२५.वर्धा जिल्हा समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी व इतर मागण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनचे पडसाद मांडगाव येथे ही उमटले सकाळी ८ ते १० या वेळात मांडगाव येथील बस स्टॅण्ड चौकात शेतकरी एकत्र आले व वर्धा उमरेड राज्य महामार्ग रोखून घरला. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या. पोलिसांनी महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली असली तरी कार्यकर्ते आक्रमक दिसून आले.अनेक शेतकऱ्यांनी नोंदवीला सरकारचा निषेधयावेळी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची राज्यकर्त्यांना आठवण नाही का असा प्रश्न विचारण्यात आला.
राज्यातील शेतकरी हवालदील झाला असताना कृषिमंत्र्यांना रमी खेळायला वेळ मिळतो तरी कसा हाही प्रश्न विचारण्यात आला शेतकरी कर्जमाफी साठी सरकार उदासीन आहे.
उद्योगपती चे कर्ज मात्र कोणतीही समिती गठीत न करता माफ करता येते.यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक् झाले.बच्चू भाऊ आगे बढो हम तुमारे साथ है अश्या प्रकारे नारे दिले.यावेळी अर्धा तास मांडगाव येथे महामार्ग रोखून धरत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी अंकित दांडेकर ,विक्रम पिसे, अक्षय दांडेकर,सचिन तडस , योगेश डफ, मानीकरावं चमडे, लीलाधर खोले,रजत डंभारे, विनोद डंभारे, संदीप कळसकर,अमोल लांबट,रोशन तडस, संजय काटवले, प्रकाश तडस, प्रशांत खडगी, कैलास मानकर,संजय लाखे, मनीष पिसुड्डे, मोरेश्वर चमडे ,पळसराम कळमकर ,मोहनराव डफ,विठ्ठल आदमने ,प्रशांत उईके,प्रशांत गोलाईत, सुरेशराव गोलाईत,पुरुषोत्तम तडस,सुरेश तडस, संजय तडस ,अमोल बोरघाटे, राहुल तडस, प्रज्वल बुकणे, नथ्थुजी पिसे , नरेश पाहुणे, नाना डुकरे, राजू चुटे ,राजू मेंढे, मयूर पादाडे ,चिंधुजी लाडीकर कमलाकर येणूरकर इ शेतकरी उपस्थित होते.


