गिरड विषेश प्रतिनिधि
प्रमोद झिबड
समुद्रपुर
![]()
दिनांक २२ जुलै २०२५.वर्धा येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठेवण्यात आलेल्या मोतीबिंदूमुक्त शिबिराच्या कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने येत असतानाच मुसळधार पाऊस सुरु झाला त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडच न दिसल्याने शिंदेंना माघारी घेत नागपूर येथे जाऊन हेलिकॉप्टर लॅन्ड करून पुन्हा बाय रोड समृद्धी महामार्गाने गाडीने परत वर्ध्याला येणे पडले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सेवाग्राम येथील चरखा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड उपस्थित होते. दुपारी १२ वाजता आयोजित केलेला हा कार्यक्रम पावसामुळे अडीच तास उशिरा सुरु करण्यात आला.
उपमुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांना झालेल्या उशिराने कारण सांगत म्हणाले, अरे मी आताच दोनदा येऊन हॅलो केले. निघतांना पावसास सुरवात झाली. कार्यक्रमस्थळी येताच पाऊस जोरात. हेलिपॅड दिसेना. गोंधळ झाला. पायलट म्हणाला आता उतरणे कठीणच. खाली काही दिसत नाही. परत फिरावे लागणार. मी त्याला धीर देत म्हणालो प्रयत्न तर करून बघ त्यावर पायलट म्हणाला प्रयत्न अंगलट येऊ शकतो. त्यामुळे कार्यक्रमापेक्षा शिंदेंना दोनदा घडलेल्या वर्धा भेटीचीच जास्त चर्चा रंगली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात जनतेने शिवसेनेचा खासदार निवडून संसदेत पाठवत शिवसेनेला साथ दिली. अमरावती, यवतमाळ हेदेखील शिवसेनेचे गड असून वर्ध्याच्या मातीत सुद्धा शिवसेना रुजवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन आज #शिवसेना वर्धा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व शिवसैनिक आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांशी याप्रसंगी संवादही साधला. गेल्या अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेद्वारे सहा हजार रुपये दिले, एक रुपयात पीकविमा दिला, वारंवार होणाऱ्या नुकसानीचे पैसे दिले, एनडीआरएफच्या नाॅर्मच्या दुप्पट पैसे दिले, लेक लाडकी लखपती योजना केली, मुलींना उच्चशिक्षण मोफत केले. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.
शिवसेनेचे कार्यालय हे लोकांसाठी आशेचे स्थान असते. शाखेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपला प्रश्न इथे सुटेल याची खात्री वाटायला हवी. तसे काम इथे बसणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांच्या हातून घडायला हवे. गरीब, शोषित, वंचित, पीडित घटकांना इथे न्याय मिळायला हवा असे आवाहन यावेळी केले. तसेच या कार्यालयातून शिवसेनेचे काम घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षादेखील याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र भोंडेकर, शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, शुभम नवले, युवासेना राज्य सचिव महाराष्ट्र, संदीप बर्डे,वर्धा जिल्हा निरीक्षक,गणेश ईखार, लोकसभा सहसंघटक, अनिल देवतारे, जिल्हा समन्वयक शिवसेना, संदीप इंगळे, शिवसेना जिल्हा संघटक, निलेश देशमुख, सह संपर्कप्रमुख वर्धा, मंगेश रावेकर, युवासेना जिल्हाप्रमुख, महेश मुडे,युवासेना जिल्हाप्रमुख वर्धा, निखिल सातपुते, वर्धा शहर प्रमुख, शैलेश रावेकर,उपजिल्हाप्रमुख देवळी, नितीन दर्यापूरकर, आर्वी विधानसभा, स्नेहल देवतारे,सेलू नगराध्यक्ष, रवी धोटे, उपजिल्हाप्रमुख हिंगणघाट- समुद्रपूर विधानसभा, सुरज पीठेकर,आर्वी उपजिल्हाप्रमुख युवासेना, प्रशांत लहामगे, शिवसेना शहर प्रमुख हिंगणघाट,गिरीधर ठवरी, शिवसेना तालुकाप्रमुख समुद्रपूर, साजिया इनामदार,वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख वर्धा, संध्या हिवरकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख समुद्रपूर, मंगेश भोंगाडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख वर्धा विधानसभा, अजय वानखेडे, उपजिल्हाप्रमुख हिंगणघाट समुद्रपूर विधानसभा व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.


