चंद्रपूर- मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टी धोरणातून साकार झालेल्या कल्याणकारी, रोजगाराभिमुख प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रेरणा व संकल्पनेतून यंदा सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या निमित्त विसर्जन सोहळ्यात चंद्रपुरातील ज्या गणेश मंडळाद्वारे विश्वकर्मा योजनेस अनुसरून देखावे प्रदर्शित करण्यात येतील अश्या गणेश मंडळांची स्पर्धेतून निवड करून त्यांना भाजपा ओबीसी मोर्चा व जय बजरंग गणेश मंडळ चंद्रपूरच्या वतिने आकर्षक बक्षिस देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या सुतार, लोहार, सोनार, कुंभार, चांभार, मिस्त्री, नाव्ही, धोबी, शिंपी, कारागीर, शिल्पकार, मुर्तीकार व अन्य व्यवसायींना समृध्द व्यवसायातून उन्नतीकडे नेण्याचा प्रधानमंत्री मोदीजींचा संकल्प असल्याने या योजनेला सार्वजनिक स्तरावर गणेश मंडळांच्या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न भाजपा ओबीसी मोर्चा तसेच जय बजरंग गणेश मंडळ चंद्रपूर महानगरच्या वतिने या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेत सहभागी मंडळाकरीता आकर्षक बक्षिसांची मेजवाणी असून प्रथम बक्षिस रूपये 41,000/- दुसरे 31,000/-, तिसरे 21,000/- चौथे 11,000/- व पाचवे बक्षिस रूपये 5,000/- ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग नोंदणी व अधिक माहितीकरीता गणेश मंडळाच्या सन्माननिय पदाधिकाऱ्यांनी मा. हंसराजजी अहीर यांचे कार्यालय बाजार वार्ड, चंद्रपूर श्री. रघुवीर अहीर प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो, श्री. विनोद शेरकी अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, श्री. धनराज कोवे अध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा यांचेशी पुढील मोबाईल क्र. 9921065165, 8055557030, 7350651982 वर संपर्क साधावा असे भाजपा ओबीसी मोर्चा व जय बजरंग गणेश मंडळ चंद्रपूरद्वारा आवाहन करण्यात आले आहे.