Home Breaking News होल्ड करून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्या बाबत उपविभागीय अधिकारी बँक अधिकाऱ्यांची बैठक...

होल्ड करून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्या बाबत उपविभागीय अधिकारी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेणार. प्रहारच्या निवेदना नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय..!

0
35

 

 

गिरड विशेष प्रतिनिधि

प्रमोद झिबड

समुद्रपुर

दिनांक २६ जून २०२५:- हिंगणघाट येथील राष्ट्रीयकृत बँकानी शेतकरी वर्गाची बँक खाती होल्ड करून ठेवल्याने शेतकरी वर्गाला आपल्या खात्यातील पैसे काढता येतं नसल्याने एन हंगामात शेतकरी वर्गासमोर मोठे संकट निर्माण झालेले आहे या विरुद्ध प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वात आज गुरुवार दि.२६ जून ला निवेदन देण्यात आले.

या निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी वर्गाला स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येतं तर नाहीच शिवाय शेतकरी सन्मान निधी, निराधार योजनाचे पैसे, घरकुल पैसे व स्वतःचे वैयक्तिक पैसे काढता येतं नाही. सध्या शेती हंगामाचा सिझन आहे. शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बी बियाणे,शेती विषयक साहित्याची खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. याबाबत शेतकरी वर्ग बँक अधिकारी वर्गाकडे विचारण्यासाठी गेल्यास बँकेच्या अधिकारी वर्गाकडून शेतकऱ्यांना अतिशय उर्मट व असभ्य भाषेत उत्तर देऊन त्यांना हाकलून लावण्यात येते व त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचविण्यात येतं आहे.

या गंभीर प्रश्नावर त्वरित मिटिंग बोलाविण्याची मागणी प्रहार तर्फे निवेदनातून करण्यात आली. या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी या कामी पुढाकार घेऊन दोन्ही तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांची व जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यांची बैठक सोमवार दि.30 जूनला ला बोलाविण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाना सांगितले अशी माहिती गजू कुबडे यांनी दिली आहे.

निवेदन देतांना सर्वश्री प्रहारचे जिल्हाप्रमुख सुरज कुबडे, सतीश गलांडे,शेखर जमुनकर, मुन्ना ठाकूर, हनुमान हुलके,महेंद्र आंबुलकर, अमोल वाघमारे,अमोल धारने, संदिप जुमडे,सुरज डफ, भोजराज हुलके,पद्माकर वाभळे, रितेश गुडढे, रामभाऊ चाफले, गणेश वरभे, मयूर पुसदेकर, योगेश उघडे,प्रेम यादव, सुरेश घवघवे, रवि कुकुर्डे,सुमित वाढई,योगेश उघडे इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here