Home Breaking News शाळेचा पहिला दिवस,शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत..!

शाळेचा पहिला दिवस,शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत..!

0
62

 

गिरड विशेष प्रतिनिधी 

प्रमोद झिबड

समुद्रपुर.

दिनांक २३ जून २०२५ .वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुका उच्च प्राथमिक शाळा वायगांव (हळद्या) यथे विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित. गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच उत्तम घुमडे, (पोलीस पाटील) आशिष पाटील, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख श्री.आडे सर मुख्याध्यापक मा.अनिल ज.मिरझापुरे व उ.प्रा.शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगीराज वैद्य समिती उपाध्यक्ष अमोल लोहकरे आणि सदस्य दिलिप सो.मरस्कोल्हे, सौ.हिना स.शेख,सौ.रूपाली सु. कातुलवार,सौ.विद्या सु.मुन,सौ.अर्चना ज्ञा.धारणे,वासुदेव ज्ञा.येवले,बालतज्ञ सौ. माला अ.पाटील, कु.सार्थक ग.श्रावने, कु.ज्ञानेश्वरी भारत येवले,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे विषय शिक्षक श्री.गणेश दे.येडमे,सहाय्यक शिक्षक दमयंती पाटील मॅडम, सहाय्यक शिक्षक सौ.गंगा आडे मॅडम, सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प माला अर्पण करून शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर विद्यार्थी शाळेत परतले, त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, फुगे लाऊन सजावट आणि खाऊ वाटप करण्यात आले, तर काही ठिकाणी लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये नवीन मित्र-मैत्रिणी मिळवण्याची उत्सुकता होती. तसेच, नवीन पुस्तके, दप्तर आणि गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षकांसाठीही हा दिवस नवीन सुरुवात घेऊन आला.

ग्रामीण भागातील शाळांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी प्रभातफेरी काढण्यात आली.एकंदरीत, ग्रामीण व शहरातील शाळेचा पहिला दिवस उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here