आवाज 24 न्यूज
राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर.
समुद्रपुर : ( दि.18) आजच्या युगात कराटे सारख्या खेळाचा नियमित सराव केल्यास शालेय जीवनात राज्य, राष्ट्रीय प्राविण्य प्राप्त केल्यास बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण व पुढे शासकीय भरतीत पाच टक्के आरक्षणाचा फायदा घेत नोकरी मिळवण्यात फायदा तर होतोच याशिवाय कराटेचा नियमित सराव केल्याने स्वतःचे, समाजाचे व पर्यायी देशाचे रक्षणकर्ते युवा तयार होते. असे प्रतिपादन स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोहन मोहिते यांनी व्यक्त केले.
स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित रविवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी सर्व सेवा संघ लेआउट, रामनगर वर्धा. येथे कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संचालक तथा विश्वसिंधी सेवा संगम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदासजी आहूजा, संस्था संचालक तथा दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाशजी खंडार तर मुख्य परीक्षक म्हणून स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे, सहपरीक्षक सेन्साई वाणी साहू, सेन्साई तेजस निवल, आयोजक सेन्साई पूजा गोसटकर, अंकुश गिरडे व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
सदर परीक्षेच्ये आयोजन दोन भागात केले असून सकाळी साडेसहा ते दहा या वेळेत शारीरिक चाचणी व सायंकाळी पाच ते आठ या वेळेत काता व बौद्धिक चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट देऊन सन्मानित केल्या जाईल. व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पाच दिवसांनी पुन्हा चाचणी घेण्यात येईल.
कार्यक्रमाचे संचालन कु. पलक लक्षणे तर आभार सौ. हेमाताई राठोड यांनी मानले.


