गिरड विशेष प्रतिनिधि
प्रमोद झिबड
समुद्रपुर.
![]()
दि. २५ मे २०२५. वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपुर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरण कार्यक्रम संपन्न घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोमधून मोफत वाळू रॉयल्टी कूपन घरपोच मिळणार आहे. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावर यांनी दिनांक २६ मे २०२५ मगळवार ला तहसील कार्यालय समुद्रपूर येथे घरकुल लाभार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना ही माहिती देण्यात आली.
आमदार कुणावार यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना १ ब्रास रॉयल्टी कुपन वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार कपिल हटकर, सोयाम साहेब गटविकास अधिकारी रोशन कुमार दुबे व सर्व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी तलाठी कर्मचारी उपस्थित होते.सर्व घरकुल लाभार्थ्यांनी आमदार समीरभाऊ कुणावार यांचे घरकुल लाभार्थ्यांनी कौतुक केले.आमचे अपूर्ण काम पूर्ण करण्यास जे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांनी आमदार साहेबांचे मनापासून आभार मानले.


