Home Breaking News तालुक्यातील शिक्षकांची आमदारांशी चर्चा..!

तालुक्यातील शिक्षकांची आमदारांशी चर्चा..!

0
36

गिरड विशेष प्रतिनिधि

प्रमोद झिबड

समुद्रपुर.

 

दिनांक २७ मे २०२५.वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपुर समुद्रपूर- जाम चौरस्ता येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका समुद्रपर च्या वतीने नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे स्वागत करून तालुक्यातील माध्यमिक शाळा व शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. विविध शाळांमधिल भौतिक व शैक्षणिक असुविधांची माहिती अडबाले यांनी जाणून घेतली.

15 मार्च 2024 चा शिक्षक व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असलेला शासन आदेश रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शिक्षकांच्या वतीने अडबाले यांना करण्यात आली.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष विष्णू इटनकर उपाध्यक्ष शशिकांत वैद्य, भारत पाटील, दिनेश वाघ, राजू चंदनखेडे, तालुका अध्यक्ष प्रफुल महंतारे, सचिव आशिष देवतळे, श्रीराम येणोरकर, उमेश वाणी राजेश यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here